देश
अशोक गेहलोत यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (दि.१७) शपथ घेतली. राज्यपाल कल्याण सिंह यांनी या दोघांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेहलोत हे तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राजस्थानचे २२वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. जयपूरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, जतीन प्रसाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याबरोबरच देशभरातील विरोधीपक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये राजदचे नेते तेजस्वी यादव, शरद यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, नॅशनल काॅन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, जीतनराम मांझी आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टालिन व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, मध्य प्रदेशात काँग्रेसला साथ देणाऱ्या बसपा सुप्रीमो मायावती आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव मात्र यावेळी अनुपस्थित होते.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.