देश
‘इंस्टाग्राम’वर मोदी एक नंबर, जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणारा नेता
nobanner
इंस्टाग्राम या लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेता ठरले आहेत. इंस्टाग्रामवर मोदींचे एकूण 15.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. मोदींनंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आहेत, त्यांचे 14 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 10.9 दशलक्ष इतके डोनाल्ड ट्रम्प यांचे फॉलोअर्स आहेत. चौथ्या क्रमांकावर पोप फ्रांसिस आणि पाचव्या क्रमांकावर जॉर्डनची महाराणी क्वीन रनिया आहे. रनिया ही कुवैतमध्ये जन्मलेली एक साधारण मुलगी होती, त्यानंतर ती महाराणी बनली. वयाच्या 48 व्या वर्षीही ती एखाद्या तरुणीप्रमाणेच दिसते.
Share this: