Menu

देश
ख्रिश्चिअन मिशेलने कोठडीत घेतलं सोनिया गांधींचं नाव, ईडीची माहिती

nobanner

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्चिअन मिशेल याने कोठडीत सोनिया गांधी यांचं नाव घेतल्याची माहिती सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) न्यायालयात दिली आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, मिशेलने इटालियन महिलेच्या मुलाचाही उल्लेख करत तो कशाप्रकारे देशाचा पुढील पंतप्रधान होईल याबद्दल सांगितलं. मिशेल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबद्दल बोलत होता.

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात सहभागी ख्रिश्चिअन मिशेल याच्या प्रत्यार्पणाला दुबई कोर्टाने मंजुरी दिल्यानंतर एका विशेष विमानाने भारतात आणण्यात आलं होतं. यानंतर त्याला ईडीने अटक केली होती. सात दिवसांची कोठडी संपत असल्याने ईडीने आज मिशेलला दिल्लीमधील पटियाला न्यायालयात हजर केलं.

ईडीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, ‘मिशेलने सोनिया गांधी यांचं नाव घेतलं आहे. पण ते कोणत्या संदर्भात घेतलं आहे हे आत्ता सांगू शकत नाही. मिशेल इटालियन महिलेच्या मुलाचा उल्लेख करत कशाप्रकारे तो देशाचा पुढील पंतप्रधान होईल याबद्दलही सांगितलं आहे’.

‘यासोबतच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला वगळून हा करार टाटासोबत कशा पद्घधतीने करण्यात आला हेदेखील त्याने सांगितलं आहे’, अशी माहिती ईडीने न्यायालयात दिली. यावेळी ईडीने मिशेलच्या वकिलांना त्याला भेटण्याची परवानगी नाकारावी अशी मागणी केली आहे. बाहेरुन मिशेलवर दबाव टाकला जात असल्याचा ईडीचा आरोप आहे.

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा काय आहे?
युपीए-१च्या वेळेस अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा व्यवहार निश्चित झाला. त्यासाठी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत ३६०० कोटी रुपयांचा व्यवहार अंतिम झाला. मात्र, या व्यवहारात १० टक्के लाच घेतल्याचा प्रकार समोर आला. युपीएच्या सरकारने २०१३मध्ये हा व्यवहार रद्द केला. दरम्यान, या प्रकरणात माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यासह १८ लोकांविरोधात खटला दाखल झाला. त्याचवेळी इटलीच्या मिलान स्थित कोर्टाने व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख केला. त्यानंतर कोर्टाने ऑगस्टा वेस्टलँडचा मालक जी. ओरसीला दोषी मानले आणि त्याला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या संपूर्ण खरेदी प्रकरणात मध्यस्थाचे काम ख्रिश्चिअन मिशेल करीत होता. मिशेलला नुकतेच दुबईतून प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणण्यात आले आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.