Menu

देश
गोरेगावमध्ये बांधकाम सुरू असलेलं दुमजली घर कोसळलं, एकाचा मृत्यू

nobanner

मुंबईतील गोरेगाव येथे बांधकाम सुरू असलेलं दुमजली घर कोसळल्याचं वृत्त आहे. यामध्ये ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झालेत.

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरमध्ये म्हाडा वसाहतीत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तात्काळ सिद्धार्थ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. रामू असं मृत व्यक्तीचं नाव असून तो 22 वर्षांचा होता. तो बांधकाम मजूर असल्याचं सांगितलं जातं. घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. तर इतर सात जण जखमी आहेत. मंगल बनसा(35 वर्षं), मुन्ना शेख(30 वर्षं), शिनू (35 वर्षं), हरी वडार (3 वर्षं), शंकर पटेल(21 वर्षं), सरोजा वडार(24 वर्षं), रमेश निशाद (32 वर्षं) जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय.