Menu

देश
ठाण्यात अज्ञात आरोपींनी नऊ दुचाकी जाळल्या

nobanner

पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता ठाण्यातही दुचाकी जाळण्याचे लोण पोहोचले आहे. ठाण्यात कौशल्य हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये उभ्या असलेल्या आलेल्या नऊ दुचाकी जाळण्यात आल्या. गुरुवारी पहाटे ३.३३ च्या सुमारास ही घटना घडली.

काही अज्ञात आरोपींनी या दुचाकी पेटवून दिल्या. यापूर्वी राज्याच्या वेगवेगळया भागांमध्ये दुचाकी जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात असे प्रकार जास्त घडतात. मुंबईतही भांडूप परिसरात दुचाकी आणि गाडया जाळल्याची घटना घडली होती.