अपराध समाचार
धक्कादायक ! तीन महिन्यांच्या गर्भवती गाईवर बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
- 254 Views
- December 25, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धक्कादायक ! तीन महिन्यांच्या गर्भवती गाईवर बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
- Edit
आंध्र प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिथापुरम मंडल येथील गोकिवाडा गावात अज्ञात लोकांविरोधात एका गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक शेतकरी नामा राजू यांनी रविवारी सकाळी तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गाय बेपत्ता झाल्याने नामा राजू तिचा शोध घेत होते. गाय तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.
नामा राजू यांची गोकिवाडा आणि बी कोथुरु दरम्यान गोशाळा आहे. या गोशाळेत तीन गाई, दोन बैल आहेत. रविवारी सकाळी गाय बेपत्ता झाल्यानंतर नामा राजू तिचा सगळीकडे शोध घेत होते. अखेर एका शेतात गाय झाडाला बांधलेल्या अवस्थेत त्यांना आढळली. तिच्या गुप्तांगातून रक्त वाहत होतं.
नामा राजू आपल्या गाईला तपासणी करण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकाकडे गेले असता तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं की, अत्याचार करण्याआधी गाईला इंजेक्शन देण्यात आलं होतं. यानंतर नामा राजू यांनी पिथापुरम ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली.
बातमी समजताच स्थानिकांनी पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी केली. यावेळी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. अशा घटना याआधीही घडल्या असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.