देश
नागपूरमध्ये ‘पॉर्न’ बघून १४ वर्षांच्या मुलाने केला सात वर्षांच्या मुलावर अत्याचार
नागपूरमध्ये १४ वर्षांच्या मुलाने शेजारी राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून पॉर्न बघून त्याने हा अत्याचार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलांच्या हाती मोबाईल दिल्यास त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, हे या घटनेतून समोर आले आहे. १४ वर्षांचा मुलगा मोबाईलवर गेम खेळण्याच्या बहाण्याने आईकडून मोबाईल घ्यायचा. यादरम्यान त्याला पॉर्नची सावय लागली. यातूनच त्याने शेजारी राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.
बुधवारी मुलगा आंघोळ करताना विचित्र वागत असल्याने आईला संशय आला. तिने मुलाकडे विचारपूस केली असता त्याने अत्याचाराची माहिती दिली. यानंतर त्याच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.