देश
मध्य प्रदेशात चुरशीची लढत; बसपा ठरणार किंगमेकर?
nobanner
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु असून बहुजन समाज पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी काँग्रेस १११ जागांवर तर भाजपा १०९ जागांवर आघाडीवर आहे.
गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपसमोर मध्य प्रदेश कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. शेतकरी वर्गाची नाराजी, व्यापम घोटाळा हे मुद्दे भाजपला प्रतिकूल ठरले होते. गेल्या वर्षभरात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुखे शिवराजसिंह चौहान यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही एक परीक्षाच म्हणावी लागेल.
Share this: