देश
मुंबई-पुणे मार्गावर वेगवेगळ्या अपघातात तीन ठार तर तीन गंभीर जखमी
nobanner
रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्सप्रेस-वे वर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत . सोमवारी सकाळीच एक्सप्रेस-वे वर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर रसायनी भाताण बोगद्याजवळ स्विफ्ट कारने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाले.
दुसरा अपघात खालापूरजवळ रात्री उशिरा झाला. दुचाकी घसरून झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार मोहम्मद रसूल जागीच ठार झाला. मोहम्मद रसूल घनसोलीत राहायचा. तर खालापूर येथील अमित शेडगे जखमी झाला आहे.
चौकजवळ झालेल्या तिसऱ्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनरची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. जखमींवर चौकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
Share this: