Menu

मनोरंजन
‘या’ अभिनेत्याकडून दीपिकाला मिळाला रणवीरशी लग्न करण्याचा सल्ला

nobanner

लग्न करण्याचा मोठा निर्णय प्रत्येकजण कुणा ना कुणाच्या सल्यावरून घेत असतो. दीपिका पदुकोणने देखील अगदी तसंच केलं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण दीपिकाने रणवीरसोबत लग्न करण्याचा निर्णय खूप अगोदर घेतला होता. याचा खुलासा नुकताच झाला आहे.

बॉलिवूडचे मोस्ट एनर्जेटिक अभिनेता अनिल कपूर यांनी नेहा धुपियाच्या कायक्रमात याचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, कसा दीपिकाने रणवीरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला?

अनिल यांनी सांगितलं की, 2015 मध्ये ‘दिल धडकने दो’च्या सेटवर दीपिका रणवीरसोबत आली होती. तेव्हा अनिल कपूरने सांगितलं की, या मुलाला सोडू नकोस. हा मुलगा सुपर्ब आहे यार… परफेक्ट चॉइस…. तुला याच्यासारखा चांगला मुलगा मिळणार नाही.

अनिल जरी 61 वर्षांचे असले तरीही ते एका तरूण अभिनेत्याला लाजवतील. अनिल कपूर यांच्या एनर्जीची चर्चा कायमच होत असते. अनिल कपूर ‘नो फिल्टर नेहा सिझन 3’मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी याचा खुलासा केला.