Menu

देश
रवी पुजारीच्या शार्प शूटरसह अन्य एकाला अटक, ४ पिस्तूल २९ काडतूस जप्त

nobanner

रवी पुजारी गँगचा शार्प शूटर आणि अन्य एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सादिक इब्राहिम बंगाली उर्फ बंटा(वय-४०) असं रवी पुजारी गँगच्या शार्प शूटरचं नाव आहे, तर धवल चंद्रप्पा देवरमानी (वय – ३७) असं दुसऱ्या आरोपीचं नाव आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पाळत ठेवून दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्या अंगझडतीत चार पिस्तूल आणि २९ काडतूस पोलीस पथकाने हस्तगत केली. दोघा आरोपींना डिसीबी सीआयडी युनिट-९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आलेली आहे. पोलीस पथक आरोपींची कसून चौकशी करीत आहे.

आरोपी सादिक इब्राहिम बंगाली उर्फ बंटा हा खंडणी उकळणारा गँगस्टर रवी पुजारी याचा शार्प शूटर असून त्याच्यावर २००६ साली प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्यावर फायरिंग केल्याचा गुन्हा आहे. २००८ मध्ये देविदास चौगुले हत्या प्रकरणाचा आरोप, तर २०१५ मध्ये लोणावळा येथील डबल मर्डर केसचा आरोपी सादिक असल्याची माहिती युनिट-९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी दिली. तर, अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी धवल चंद्रप्पा देवरमानी हा नवी मुंबई पोलिसांचा खबरी असून तो उत्तरप्रदेश आणि बिहार मधून हत्यारे आणून ती विविध गँगस्टर यांना पुरविण्याचा त्याचा धंदा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघा आरोपींना युनिट-९ च्या पोलीस पथकाने अटक केल्याने रवी पुजारीचा शार्प शूटर आणि सराईत गुन्हेगार यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई पोलीस दलाचे डिसीबी सीआयडी युनिट-९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस पथकाने सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. संशयास्पद हालचाली असलेल्या दोघा तरुणांना पोलिसांनी हटकले आणि ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करीत त्यांची अंगझडती घेतली असता या दोघा आरोपींकडून पोलिसांनी चार पिस्तूल आणि २९ काडतुसे हस्तगत केली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीत सादिक इब्राहिम बंगाली उर्फ बंटा आणि धवल चंद्रप्पा देवरमानी यांचा समावेश आहे. पोलिसांनी दोघांविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात भादंवि विना परवाना प्राणघातक शस्त्र बाळगण्याबाबत गुन्हा दाखल केला. आरोपीना युनिट-९ च्या ताब्यात अधिक चौकशी करीता सोपविण्यात आलेले आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.