देश
राजन गँग भाजपासाठी काम करत आहे – नवाब मलिक
बईत राजन गँग भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपात गुंडांची टोळी प्रवेश करत आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला. धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे खळबळजनक आरोप केले आहेत. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी नवाब मलिक धुळ्यात आले होते.
पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये 20 कोटींचा घोटाळा केला आहे. पर्यटन विभागात 18 महिन्यात सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचा मुद्दा उपस्थित करत यामागचं नेमकं कारण काय असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
शिर्डी संस्थानकडून घेण्यात आलेलं 500 कोटींचं कर्ज हे मंदिराच्या तिजोरीवर हात मारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं यावेळी नवाब मलिक यांनी म्हटलं. यावेळी बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मंचावर उपस्थित लावण्याला पाठिंबा दर्शवत पाठराखण केली.