Menu

देश
लायकी दाखवली ! ताशी 180 किमी वेगाने धावणाऱ्या सर्वात वेगवान ‘ट्रेन 18’ वर दगडफेक

nobanner

भारतीय रेल्वेची सर्वात वेगवान रेल्वे असणाऱ्या ‘ट्रेन 18’ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबरला हिरवा कंदील दाखवणार आहेत. एकीकडे ‘ट्रेन 18’ भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत असल्याने भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असताना काहीजणांनी रेल्वेवर दगडफेक केल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी दिल्ली ते आग्रादरम्यान रेल्वेची चाचणी घेण्यात आली. यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केली. या दगडफेकीमुळे रेल्वेच्या काचा फुटल्या.

या घटनेनंतर इंटिग्रल कोच फॅक्टरीचे जनरल मॅनेजर सुधांशू यांनी ट्विट करत निषेध नोंदवला. ‘रेल्वेवर दगडफेक करत काहीजणांनी काचा फोडल्या आहेत. आम्ही लवकरच त्यांची माहिती मिळवू’, असं त्यांनी म्हटलं आहे. या घटनेचा तपास केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ट्रेन 18 देशातील पहिली विनाइंजिन रेल्वे असणार आहे. ही रेल्वे दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावणाऱ्या शताब्दी ट्रेनची जागा घेईल. रेल्वेच्या पहिल्या चाचणीत टी-18 ताशी 160 किमी वेगाने धावली होती. दुसऱ्या चाचणीत तिने ताशी 180 किमीचा टप्पा गाठला होता. चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीत या रेल्वेची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

16 कोच असलेली ही रेल्वे पूर्ण वातानुकूलित आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूस एरो डायनामिक ड्रायव्हर केबिन आहेत. सध्या जो प्लान आखण्यात आला आहे त्याप्रमाणे, ही ट्रेन सकाळी सहा वाजता नवी दिल्लीहून निघेल आणि दुपारी दोन वाजता वाराणसीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे दुपारी 2.30 वाजता वाराणसीहून निघेल आणि रात्री 10.30 वाजता राजधानी दिल्लीत पोहोचले.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.