अपराध समाचार
साताऱ्यात भीषण अपघात; जीप दरीत कोसळून चार ठार
- 248 Views
- December 22, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on साताऱ्यात भीषण अपघात; जीप दरीत कोसळून चार ठार
- Edit
nobanner
साताऱ्यात भीषण कार अपघात झाला असून नियंत्रण सुटलेली जीप २५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ९ जण या अपघातात जखमी झाले आहेत. भोजलिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.
सांगलीतील काही भाविक माण तालुक्यातील डोंगरावरील श्री भोजलिंग देवस्थानच्या दर्शनासाठी जात होते. म्हसवड येथील जांभुळणीकडील डोंगर उतारावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीप दरीत कोसळली. जीप दरीत कोसळल्याने चार भाविकांचा मृत्यू झाला. जीपमध्ये एकूण १३ जण होते. अपघातात जखमी झालेल्या उर्वरित नऊ जणांना उपचारासाठी म्हसवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दर्शनासाठी जात असलेली जीप आटपाडी येथील विटलापूर येथील असल्याचे समजते.
Share this: