अपराध समाचार
आईच्या मोबाइलवर मेसेज टाकल्याचा जाब विचारल्याने तरुणाला मारहाण
- 249 Views
- January 21, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on आईच्या मोबाइलवर मेसेज टाकल्याचा जाब विचारल्याने तरुणाला मारहाण
- Edit
पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने माझ्या आईच्या मोबाइलवर मेसेज का टाकलास असा जाब घरातील सदस्यांसमोर विचारल्यामुळे त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीये. याशिवाय संबंधित मुलाच्या आईने मारहाण करणाऱ्यांनी विनयभंग केल्याचीही तक्रार केली आहे. याप्रकरणी पंडित शिंदे,विनोद शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिचा मुलगा आरोपींच्या शेजारी राहण्यास असून महिलेचे पती लष्करात आहेत. घरात आई आणि १९ वर्षीय मुलगाच असतो. गेल्या आठवड्यात आरोपी पंडित शिंदे याला तुम्ही माझ्या आईच्या मोबाइलवर ‘आठवण येते का?’ असा मेसेज का टाकला असा जाब त्यांच्या घरातील सदस्यांसमोरच विचारला होता. त्यानंतर आरोपी पंडित शिंदे, प्रमोद शिंदे आणि विनोद शिंदे यांनी घरात घुसून मुलाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, यात मुलगा जखमी झाला. याशिवाय मुलाच्या आईचा विनयभंगही केला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.