अपराध समाचार
उलटी करण्यासाठी डोकं बसच्या खिडकीबाहेर काढलं अन् धडापासून शीर वेगळं झालं
- 248 Views
- January 21, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on उलटी करण्यासाठी डोकं बसच्या खिडकीबाहेर काढलं अन् धडापासून शीर वेगळं झालं
- Edit
मध्य प्रदेशमध्ये एका विचित्र अपघात घडला आहे. भोपाळ शहरामध्ये घडलेल्या या अपघातामध्ये एक महिला प्रवाशाचा दूर्देवी मृत्यू झाला आहे. उलटी करण्यासाठी या महिलेने खिडकीबाहेर डोकं काढले होते. मात्र बस चालक अगदी भरधाव वेगाने नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवत असल्याने या महिलेचे डोके रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विजेच्या खांबाला आदळले. हा आघात इतका भयंकर होता की त्या महिलेचे मुंडकेच रस्त्यावर पडले आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
शहरामधील डायमंड क्रॉसिंगजवळ हा विचित्र अपघात घडला. अपघातात जखमी झालेली महिला ही ५५ वर्षांची असून तिचे नाव आशा राणी असे असल्याची माहिती समोर आली आहे. आशा या सटाणा जिल्ह्यातून पाटणा जिल्ह्यात प्रवास करत होती. यावेळी बसचालक अगदी वेडीवाकडी वळणे घेत भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे मळमळल्यासारखे झाल्याने आशा यांनी उलटी करण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढले. मात्र त्यांचे डोके रस्त्याच्याकडेला असणाऱ्या पथदिव्याच्या खांबाला आदळले. हा आघात इतका जोरदार होता की या महिलेचे शीर धडापासून वेगळे होऊन रस्त्यावर पडले. यासंदर्भात स्थानिक पोलीस अधिकारी अरविंद कुजूर यांनी पीटीआयला फोनवरून दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी बसचालकाला अटक करण्यात आली आहे. ‘चालकाला वेगाने गाडी चालवण्याचा तसेच रस्त्यावर चालणाऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे’, अशी माहिती अरविंद यांनी दिली.
शवविच्छेदनानंतर आशा यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आशा या मूळच्या छत्तापूर जिल्ह्यातील रहिवाशी होत्या.