अपराध समाचार
डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून 170 प्राणघातक शस्त्रे जप्त
- 268 Views
- January 16, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून 170 प्राणघातक शस्त्रे जप्त
- Edit
डोंबिवलीतील भाजपाचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने 170 प्राणघातक शस्त्रे जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनंजय कुलकर्णी (वय 49) असे या भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव असून त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे.
डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर तपस्या फॅशन हाऊस हे दुकान आहे. हे दुकान भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या मालकीचे आहे. धनंजय कुलकर्णी हा भाजपाचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे. त्याच्या दुकानात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी छापा टाकून शस्त्रसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा सुमारे 2 लाख रुपयांचा आहे. यात पिस्तूलचाही समावेश आहे. भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणामुळे भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.