Menu

अपराध समाचार
तेजस एक्सप्रेसची धडक लागून रेल्वेच्या तीन कामगारांचा मृत्यू

nobanner

तेजस एक्स्प्रेसची धडक लागून तिघांचा झाल्याची घटना समोर आली आहे. पेण रेल्वे स्थानकावळील जिते गावाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. हे तिघे रेल्वेचे कामगार होते. रविवारी रात्री हा अपघात झाला. मृतदेह पेणच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांकडे सोपवण्यात येतील.

अशोक बारे (30), मानसिंग गुलकर (40) आणि अजय दांडोदिया (18) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही रविवारी रात्री रेल्वे रुळ ओलांडत असताना तेजस एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. पेण आणि पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान असणाऱ्या जिते रेल्वे स्थानकाशेजारी हा अपघात झाला. तिघेही रेल्वेचे कंत्राटी कामगार होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.