Menu

देश
दोन जातींमध्ये दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात एकत्र लढूया

nobanner

ओबीसी-मराठा या जातीमध्ये आरक्षणाच्या नावावर लढवलं जात आहे. दोन्ही समाजाला सांभाळून रहावे लागणार आहे. तुमची-आमची लढाई ही दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात आहे ती एकत्रित लढवली पाहिजे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महाडच्या जाहीर सभेत केले.

आमदार छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांची नक्कल करत तर कधी त्यांच्या घोषणांवर टिप्पणी करत आणि खोट्या आश्वासनांचा समाचार घेत जोरदार हल्ला केला. भाजपा आणि सेना युतीबाबत आणि भाष्य करताना कधी कोपरखळी करत तर कधी अमित शाह आणि उध्दव ठाकरे यांचा समाचार घेत आणि मध्येच शेरोशायरी करत छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये चेतना भरण्याचा प्रयत्न केला.

भाजप सरकारच्या फसव्या घोषणा आणि योजनांचा पाऊस व बिघडलेली कायदा व सुव्यवस्था,सरकारला आलेला सत्तेचा माज याविरोधात जोरदार प्रहार केला. राफेल, चाय, पकोडे, मिडियावरील बंदी, युतीतील वाद या सगळ्या विषयांना हात घालत छगन भुजबळ यांनी सरकारवर तोफ डागली. या रायगडावरुन विजयाची ज्योत पेटवण्यासाठी माघार घ्यायची नाही, शेवटचं मत मतपेटीत पडेपर्यंत बाजुला हटायचे नाही असा निर्धार करण्याचे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले.