अपराध समाचार
धक्कादायक! मुंबईत ४५ वर्षाच्या महिलेने केला १२ वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ
- 210 Views
- January 07, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धक्कादायक! मुंबईत ४५ वर्षाच्या महिलेने केला १२ वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ
- Edit
मुंबईत वांद्रे येथे एका १२ वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगा आई आणि भावंडांना भेटण्यासाठी वांद्रे येथील त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी ही घटना घडली. पीडित मुलाचे आई-वडिल विभक्त झाले आहेत. मुलगा आईच्या घरी पोहोचला तेव्हा आई आणि भावंडे घरी नव्हती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या महिलेने त्याला तिच्या घरी थांबण्यास सांगितले.
शेजारी राहणाऱ्या महिलेला मुलगा ओळखत होता. त्यामुळे तो तिच्या घरी गेला. घरात असताना या महिलेने आपला लैंगिक छळ केला असे मुलाने पोलिसांना सांगितले. मुलाचे वडिल जेव्हा त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी त्यांना मुलगा निराश दिसला. त्यांनी मुलाला निराशेचे कारण विचारले तेव्हा तो काही बोलला नाही. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
विश्वासात घेऊन विचारल्यानंतर मुलाने सर्व घडलेला प्रकार सांगितले. महिलेने तिच्या घरात असताना आपला लैंगिक छळ केला व याबद्दल कुठे बोलू नकोस असे बजावल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. आम्ही मुलाची जबानी नोंदवून घेतली आहे. पोस्को कायद्यातंर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रविवारीच आरोपील अटक केली. न्यायालयाने महिलेला पोलीस कोठडी सुनावली आहे.