Menu

अपराध समाचार
पतीचे पत्नीला अश्लील मेसेज, पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

nobanner

पतीने पत्नीच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवले आणि त्यानंतर पत्नीने थेट पोलीस स्थान गाठलं व पतीविरोधात तक्रार केली. पिंपरी-चिंचवडच्या कामगार नगर येथे ही घटना घडली आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पिंपरी पोलिसांनी पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पत्नीच्या मोबाइलवर ३८ वर्षीय पती गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अश्लील मेसेज करत होता. अखेर याला कंटाळून पत्नीने पिंपरी पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात फिर्याद देत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. चार ते पाच वर्षांपासून पती पत्नीनेचे पटत नव्हते, दोघांमध्ये सतत वाद होत असत. अखेर दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि पाच महिन्यांपासून ते वेगळं राहात होते. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. मुलाचा सांभाळ पती करत असून ते नाशिक येथे वाहनचालक म्हणून काम करतात. तर पत्नी भावाकडे राहते, गेल्या काही महिन्यांपासून पती सतत पत्नीला अश्लील मेसेज करत होता. पत्नीने अनेक मेसेज डिलीट करत दुर्लक्ष केले. परंतु, मेसेजचा अतिरेक होत असल्याने अखेर पत्नीने पिंपरी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे हे करत आहेत.