देश
प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात भीषण आग, अनेक तंबू जळून खाक
nobanner
संगम नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यात सोमवारी आगीची घटना समोर आलीय. या आगीनं दिगंबर आखाडा आणि त्याच्या आजूबाजूच्या तंबूनाही आपल्या ज्वालांमध्ये घेरलंय. कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी जमली असताना ही आग तेजीत पसरत असल्याची माहिती हाती येतेय.
दोन सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. प्रशासनानं लोकांना शांतीचं आवाहन केलंय. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.
आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान आगीमुळे घाबरलेल्या साधु-संतांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरलंय.
Share this: