देश
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी आणि मोटारसायलकची धडक; एक तरुण ठार, तीन गंभीर
nobanner
मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एसटी बस आणि मोटारसायकलची भीषण धडक झाली. यामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, महाड तालुक्यातील नाते येथून वाकी गावाकडे चार तरुण एकाच मोटारसायकलवरून जात होते. महामार्गावरील चांभार खिंड गावच्या हद्दीमध्ये अचानक समोरुन आलेल्या एसटी बसची जोरदार धडक बसली आणि यामध्ये एकजण जागीच ठार झाला. दिलीप घोगरे (वय २०, राहणार वेल्हा पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर अन्य तिघं गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी महाड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Share this: