Menu

खेल
विश्वविजेत्या कार्लसनकडून विश्वनाथन आनंद पराभूत

nobanner

भारताचा ‘चौसष्ट घरांचा राजा’ विश्वनाथन आनंद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पराभूत झाला. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने दहाव्या फेरीत आनंदला पराभूत केले. या पराभवामुळे आनंदचे सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. आनंदने या स्पर्धेत सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली होती. पण कार्लसनने त्याचा पराभव केला. इतर कोणत्याही खेळाडूकडून आनंद पराभूत झाला नसता. पण कार्लसन समोर होता म्हणून आनंद पराभूत झाला, असे जाणकारांचे मत आहे.

आनंदचे सहा गुण असून तो चीनच्या किंग लिरेन व नेपोमिनियाची यांच्यासह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. कार्लसनने सात गुणांसह आघाडी घेतली आहे. अनिश गिरी त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहे. इतर सामन्यात भारताच्या विदीत गुजराती याने रशियाच्या ब्लादिमिर क्रमॅनिकला पराभूत केले. हंगेरीच्या रिचर्ड रैपोर्टने पोलंडच्या ख्रिस्तोफला पराभूत केले. तर जॉर्डन वॉन फोरिस्ट याने इयान नेपोमिनियाची याचा पराभव केला.