Menu

अपराध समाचार
उत्तर प्रदेशात एका घरात शक्तीशाली स्फोट, १० जणांचा मृत्यू

nobanner

उत्तर प्रदेशच्या भादोही जिल्ह्यातील रोताहा गावातील एका घरात शनिवारी सकाळी कानठळया बसवणारा मोठा स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्फोटानंतर दोन घर कोसळली. एका फटाके व्यापाऱ्याच्या घरात हा स्फोट झाला. इरफान मन्सुरी यांच्या घरात हा स्फोट झाला. ते फटाके बनवण्याचा आणि विक्रीचा व्यवसाय करतात अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळी ११.३०च्या सुमारास हा स्फोट झाला. जवळपास चार किलोमीटरपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, जवळपास ५० फूटापर्यंत घरातील वस्तू, वीटा पडलेल्या होत्या.

पोलीस आणि स्थानिकांनी मिळून ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमला बोलवण्यात आले आह असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय कुमार यांनी सांगितले.