Menu

देश
कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून जेडीएस आमदाराला ३५ कोटींची ऑफर

nobanner

कर्नाटकातील भाजपाच्या नेत्यांनी आपल्याला ३५ कोटींची ऑफर दिल्याचा दावा जेडीएसच्या एका आमदाराने केला आहे. या दाव्यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी भाजपाने साम-दाम-दंड भेदची निती अवलंबल्याचे चित्र आहे.

जेडीएसचे आमदार के. श्रीनिवास गोवडा यांनी याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, भाजपाचे नेते सी. एन. अश्वथनारायण, एस. आर. विश्वनाथ आणि सी. पी. योगेश्वरा हे माझ्या कार्यालयात आले होते. भेटीदरम्यान त्यांनी मला जेडीएसमधून बाहेर पडून भाजपात येण्यासाठी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली. या सौद्यासाठी आगाऊ ५ कोटींची रक्कमही त्यांनी मला देऊ केली. मात्र, मी पक्षाशी प्रामाणिक असून गद्दारी कधीही करणार नाही असे त्यांना सुनावले.

यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्या कानावर ही बाब घातली असून भाजपाच्या आमदारांना पैसे पुन्हा घेण्यास सांगितल्याचे गोवडा यांनी सांगितले.