अपराध समाचार
दहशतवाद्यांनी केली महिलेची हत्या, गोळी झाडतानाचा व्हिडिओ केला व्हायरल
- 260 Views
- February 02, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on दहशतवाद्यांनी केली महिलेची हत्या, गोळी झाडतानाचा व्हिडिओ केला व्हायरल
- Edit
जम्मू- काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी 25 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. महिलेवर गोळी झाडतानाचा व्हिडिओ दहशतवाद्यांनी सोशल मीडियावरही अपलोड केला असून तिचा भाऊ दहशतवादी संघटनेत होता.
दहशतवाद्यांनी पुलवामा येथे कॉम्प्यूटर क्लासवरुन परतणाऱ्या इशरत मुनीर या 25 वर्षांच्या तरुणीचे अपहरण केले. इशरत ही डांगेरपुरा या गावातील रहिवासी आहे. इशरतचा चुलत भाऊ झीनत- उल- इस्लाम हा अल- बदर या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होत्या. 14 जानेवारी रोजी त्याच्यासह दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते. झीनत इस्लामची माहिती सुरक्षा दलांना देण्यामागे इशरतचा हात होता, असा संशय दहशतवाद्यांना होता. यातूनच त्यांनी इशरतची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
इशरतची हत्या करताना दहशतवाद्यांनी कॅमेऱ्यात रॅकोर्डिंग केले. हा व्हिडिओ गुरुवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. इशरतवर जवळून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडण्यापूर्वी तिचे हात बांधलेले होते, असे व्हिडिओत दिसते, असे पोलिसांनी सांगितले.