Menu

अपराध समाचार
पंढरपूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, मुंबईचे पाच जण ठार

nobanner

पंढरपूर-सोलापूर महामार्गावर कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जवळील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेले पाचही जण मुंबईतील आहेत.

पंढरपूरकडे जाणारी कारने (एमएच03 AZ 3116 ) एसटी बसला धडकली. कारने बसला समोरून जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. सध्या अपघातातील मृतांना सरकारी रुग्णालयात नेण्यात येत असून मृतांची ओळख पटविण्याच काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना तात्काळ रूग्णालयात हलवले.