देश
पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानच, NIA ला मिळाले स्पष्ट पुरावे
पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती महत्वाचे पुरावे लागले असून एनआयए लवकरच या संपूर्ण कटाचा उलगडा करेल. हाती लागलेल्या पुराव्यांवरुन जैश-ए-मोहम्मदचे चार ते पाच जण या कटात सहभागी असल्याचे संकेत मिळत आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडक देण्यासाठी ज्या मारुती इको गाडीचा वापर करण्यात आला. त्या गाडीच्या मालकाची ओळख पटवण्यात आली आहे.
काश्मीरमध्ये आठ वर्षांपूर्वी या मारुती इको गाडीची नोंदणी करण्यात आली होती. मालकाच्या संमतीने या गाडीचा स्फोटासाठी वापर करण्यात आला. या कारचा मालक फरार झाला आहे. पाकिस्तान या हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचे ठळकपणे दिसत आहे. स्फोट घडवण्यासाठी कंटेनरमध्ये २५ किलो आरडीएक्स ठेवण्यात आले होते. जैशच्या दहशतवाद्यांना इतके आरडीएक्स कसे मिळवले ते शोधून काढावे लागेल असे एनआयएच्या सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मागच्यावर्षी मार्च महिन्यात बेपत्ता झाल्यापासून आदिल अहमद दार जैश-ए-मोहम्मदसाठी काम करत होता. सुरक्षा दलांनी आदिलचे घर जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्या मनात सीआरपीएफबद्दल राग धुमसत होता. सुरक्षा दलांनी रात्रीच्या सुमारास काकापोरा येथे राहणारा आमचा सहकारी आदिल अहमद दारचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हे लज्जास्पद कृत्य असून जम्मू-काश्मीरमधला प्रत्येक लष्करी तळाला लक्ष्य करुन जाळून टाकू असे जैशच्या प्रवक्त्याने म्हटल्याचे वृत्त जीएनएस या वृत्तसंस्थेने दिले होते.
आदिलच्या मनातील हा राग, द्वेष हेरुन जैशच्या स्थानिक हँडलरने त्याचे ब्रेन वॉश केल्याची शक्यता आहे. सीमेपलीकडून सूचना मिळाल्यानंतर त्याला सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ल्यासाठी तयार केले असा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढला आहे. या हल्ल्यामध्ये कोण सहभागी होते त्यांची माहिती देण्यास एनआयएने सध्या नकार दिला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.