Menu

देश
मुंबई अहमदाबाद महामार्गावर एलपीजी टँकरने घेतला पेट

nobanner

मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका एलपीजी टँकरचा दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. तलासरी तालुक्यातील अच्छाड नंदीगाव या ठिकाणी ही घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून वायूगळतीही झाल्याने टँकरने पेट घेतला. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब मागील तीन तासांपासून प्रयत्न करत आहेत. या महामार्गावरची दोन्हीकडची वाहतूक सुरक्षेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आली आहे. मागील तीन तासांपासून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकलेले नाही.