अपराध समाचार
मुंबई-पुणे मार्गावरील खालापूरजवळ अलना कंपनीत भीषण आग
- 252 Views
- February 24, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मुंबई-पुणे मार्गावरील खालापूरजवळ अलना कंपनीत भीषण आग
- Edit
nobanner
मुंबई पुणे मार्गावरील खालापूरजवळ असलेल्या अलना कंपनीत भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. ही खाद्य तेलाची कंपनी असल्याची माहिती आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून खोपोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.
अगिनशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर ताबा मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे आकाशात मोठे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. मुंबईहून पुण्याला जाताना लागणाऱ्या पहिल्या टोल नाक्याजवळ अलना ही कंपनी आहे. तसेच या कंपनीला लागूनच इंडियन ऑईल कंपनी असल्याचं समजतंय. (सविस्तर वृत्त लवकरच)
Share this: