अपराध समाचार
मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या
- 206 Views
- February 26, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या
- Edit
nobanner
मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतोस असं विचारल्याने दोघांनी एका तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंदननगर पोलीस घटनेचा तपास करत आहेत. चंदन जयप्रकाश सिंग या तरूणाचा खून झाला आहे. टिपू सुलतान फिरोज मनसुरी आणि अनिरुद्ध अमरीश राठोड असं आरोपीचं नाव आहे. लेबर कॅम्प जवळ सुप्रिया भोसले आणि चंदनसिंग हे बोलत उभे होते. त्यावेळी टिपू आणि अनिरूद्ध राठोड हे सुप्रियाकडे वाईट नजरेने पाहात होते. त्याचा जाब चंदन सिंग याने विचारला असता चंदनला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत नंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. दोन्ही आरोपी फरार आहेत.
Share this: