देश
शरद पवार लोकसभेच्या रिंगणात, माढामधून लढणार
nobanner
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अखेर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत काँग्रेसबरोबर आतापर्यंत जागावाटपाबाबत झालेल्या वाटाघाटी, पक्षाच्या वाट्याला येणारे मतदारसंघ, काही जागांबाबत निर्माण झालेला पेच, इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली.
Share this: