अपराध समाचार
सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरले, 6 जणांचा मृत्यू
- 251 Views
- February 03, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरले, 6 जणांचा मृत्यू
- Edit
nobanner
बिहारमध्ये सीमांचल एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेकजण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हाजीपूर-बछवाडा दरम्यान जोगबनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या सीमांचल एक्सप्रेसला हा अपघात झाला.
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर आले असं सांगितलं जात आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी आहेत. रेल्वेची मेडिकल व्हॅन आणि डॉक्टरही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Share this: