Menu

अपराध समाचार
१९ वर्षीय शिक्षिकेवर मुख्याध्यापकाने केला बलात्कार; खेरवाडी पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा

nobanner

मुंबई – वांद्रे पूर्वेकडील एका शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील मुख्याध्यापकाने १९ वर्षीय शिक्षिकेचा लैंगिक छळ केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने स्पाय कॅमेऱ्यात आपल्यावर झालेला दुर्दैवी प्रकार टिपला आहे. खेरवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेवर केलेल्या बलात्काराप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.