Menu

अपराध समाचार
कुर्ल्यात भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू

nobanner

मुंबईत नेहमीच गजबजलेल्या कुर्ला परिसरात मंगळवारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडलीय. कुर्ल्याच्या हलाल पूल परिसरात हो गोळीबार झालाय. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिलीय. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच व्ही बी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. ही गँगवॉरची घटना असल्याचं सांगण्यात येतंय.

या भागात मोकळा वावर असणाऱ्या कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्ली याच्यावर हा गोळीबार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजल्याच्या सुमारास दोन बाईकस्वारांनी समोरून बिल्लावर गोळ्या झाडल्या आणि ते फरार झाले.

विनोबा भावे नगर पोलिसांनी गंभीर अवस्थेतील बिल्लाला जवळच्याच सायन रुग्णालयात हलवलं. परंतु, उपचारादरम्यान बिल्लाचा मृत्यू झाला. बिल्ला सध्या जामिनावर तुरुंगाच्या बाहेर होता.

हा गोळीबार कुणी आणि का केला? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेत आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. परंतु, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत मात्र दहशतीचं वातावरण आहे.