Menu

दाऊदला शरणागती का दिली नाही याचा पवारांनी खुलासा करावा- आंबेडकर

nobanner

भारिप-बहूजन महासंघ आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाऊद इब्राहीम प्रकरणात हात घातला आहे. दाऊदला सरेंडर व्हायचे होते त्यावेळी त्याला शरणागती का दिली नाही ? असा प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीररीत्या हा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नावरून त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना घेरले आहे.

राम जेठमलानी यांना लंडन मध्ये दाऊद भेटला होता. त्याने ‘मला सरेंडर व्हायचं आहे’ असे सांगितले. ‘फक्त मला थर्ड डिग्री वापरू नका’ असेही तो म्हणाल्याचे आंबेडकर म्हणाले. त्यावेळी राम जेठमलानी यांनी शरद पवार यांना ही माहिती सांगितली होती. पवार हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. पण यानंतर शरद पवार यांनी हे पंतप्रधान यांना सांगितलं का ? मंत्रिमंडळात सांगितले का ? या बद्द्ल पवारांनीच खुलासा करावा असे आव्हान त्यांनी केले आहे.

पवारांनी स्वतः च निर्णय घेतला कोणाला कळवले की नाही ? असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. दाऊद सरेंडर होत असताना पवारांनी का करून घेतले नाही ? याचा खुलासा करण्याची मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. दाऊद कायदेशीर शिक्षा भोगण्यास तयार होता पण पवारांनी तेव्हा नाकारले. आता दाऊद मिळावा यासाठी आपण पाकिस्तानकडे भीक मागतोय असेही ते म्हणाले.



Translate »