Menu

अपराध समाचार
धक्कादायक ! आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार

nobanner

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे रुग्णालयातच महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्वसनाचा त्रास असल्याने महिला रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेला उपचारासाठी आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी आयसीयुतच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘महिलेला श्वसनाचा त्रास असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेने रविवारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिमोहन सिंग यांनी दिली आहे. महिलेच्या पतीने केलेल्या आरोपानुसार, पत्नीला आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. तिला इंजेक्शन देत बेशुद्द करण्यात आलं होतं. यानंतर तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान जेव्हा बलात्कार झाला तेव्हा आयसीयूमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होते असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत याप्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे.