Menu

देश
मंत्रालयासमोर बेरोजगार तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

nobanner

मंत्रालयासमोर बेरोजगार तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरूणाचे नाव समजलेले नाही. मात्र रोजगार न मिळाल्याने या तरूणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

या तरूणाने मंत्रालयाच्या गार्डन गेटवर या बेरोजगार तरूणाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतले. धनंजय मुंडे यांनी ही माहिती ट्विट करत सरकारचा निषेध नोंदवला आहे. २ कोटी रोजगार वर्षाला देऊ असं आश्वासन देणारं हे सरकार आश्वास पाळू शकलेलं नाही त्यामुळे तरूणांवर अशी वेळ येते आहे असं म्हणत त्यांनी विद्यमान सरकारवर टीका केली आहे.