Menu

देश
मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

nobanner

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. पर्रिकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात शोकाकूल वातावरण आहे.

१३ डिसेंबर १९५५ रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पर्रिकर यांची सामाजिक कारकिर्द संघाचे प्रचारक म्हणून सुरू झाली. आयआयटी, मुंबईतून त्यांनी धातुशास्त्रात अभियंता पदवी घेतल्यानंतरही ते संघाचे काम करीत राहिले. संघाशी असलेले संबंध त्यांनी कधी लपवले नाहीत. ते संघाच्या संचलनातही सहभागी होत.