Menu

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

nobanner

विविध कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आज मेगाब्लॉक घेतला आहे. माटुंगा ते मुलुंड डाऊन धिमा मार्ग, सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर व चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असेल. हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून मध्य रेल्वे मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या उशिराने धावतील.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे – माटुंगा ते मुलुंड डाऊन धिमा मार्ग

कधी- स.११.२० ते दु.३.५० वा

परिणाम- माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. धिम्या मार्गावर विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकात लोकल थांबणार नाहीत.

पश्चिम रेल्वे

कुठे- चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दोन्ही जलद मार्गावर

कधी- स.१०.३५ ते दु.३.३५ वा

परिणाम- चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येत असल्याने त्या स्थानकादरम्यानची लोकल सेवा धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

हार्बर मार्ग

कुठे- सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर

कधी- अप मार्ग-स.११.१० ते दु.३.४० आणि डाऊन मार्ग- स.११.४० ते दु.३.४० वा

परिणाम- सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील



Translate »