Menu

देश
20 राज्यांतील 91 जागांसाठी मतदानास सुरूवात

nobanner

आज लोकसभेची लढाई खऱ्या अर्थाने सुरू होत असून २० राज्यांमधल्या ९१ मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरीचे मतदान होत आहे. या सर्व मतदारसंघांमधल्या प्रत्येक मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी आणि पथकं सज्ज आहेत. विदर्भातल्या ७ मतदारसंघांबरोबरच छत्तीसगडमधल्या अतिसंवेदनशील बस्तरमध्येही आज पहिल्या टप्प्यातच मतदान होत आहे. यावेळी प्रथमच सर्व मतदानकेंद्रांवर व्हीव्हीपॅट मतदानयंत्राचा वापर होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. देशाच्या विकासासाठी मतदान महत्त्वाचे असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तर लोकशाहीसाठी सर्वांनी मतदान करा असे आवाहन सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी केले आहे.

विदर्भातील सात जागांसाठी आज मतदान होत आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सर्वच ठिकाणी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि आणि सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने कंबर कसली आहे. नक्षलप्रभावित भागात सकाळी ७ ते ३ पर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे.

काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत. विदर्भातील सात जागांपैकी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नाना पटोले यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर चौथ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत. मतदान होत असलेल्या सातपैकी सध्या चार मतदारसंघांत भाजप, दोन ठिकाणी सेना आणि भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा खासदार आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.