Menu

अपराध समाचार

nobanner

दीड कोटी किंमतीचे मांडूळ जातीचेपालघर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून मांडूळ जातीचे दोन साप जप्त केले आहेत. पालघर जवळील मनोर येथे ही कारवाई करण्यात आली. मांडूळ जातीच्या या सापांची किंमत प्रत्येकी दीड कोटी रुपये आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेला एक जण राजकीय पक्षांशी संबंधित आहे. हे साप दुर्मिळ असून जादूटोणा आणि औषधासाठी वापरतात.

मांडूळ म्हणजेच रेड सॅन्ड बोआ
मांडूळ नावाचा बिनविषारी व अत्यंत दुर्मीळ प्रजातीचा साप आहे असे सर्पतज्ञांनी सांगितले. या सापाची सरासरी लांबी २ फूट ६ इंच एवढी असून काळा तपकिरी रंगाचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही या सापाची कोटयावधी रुपये असते.

सदर सापाचे तोंड व शेपटी दिसायला साधारण सारखीच असते. मऊ जमिनीत राहणार हा साप कोरड्या जागी राहण्यास पसंती दर्शवतो. पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यास हा जमिनीवर येतो, या सर्पामुळे काळा जादू करता येतो अशी लोकांची अंधश्रद्धा आहे. आणि त्यामुळेच या प्रजातीचे सापांचे आस्तित्व धोक्यात आले आहे. दोन साप जप्त, दोघांना अटक