देश
अनुसूचित आणि भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या लोकांना धमकावून जागा सोडण्यास भाग पाडले
शहरातील सोमवार पेठ येथील सर्वे नं.6 मध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास असणाऱ्या अनुसूचित आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना धमकावून जागा सोडण्यास भाग पाडले जात असून यामध्ये नगरपालिका तसेच पदाधिकारी या गरीब लोकांना ही जागा सोडण्यास भाग पाडीत असल्याचा आरोप करून या लोकांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी,जिल्हापोलिस प्रमुख यांना बहुजन समाज पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत येथील सर्व पीडित लोकांनी निवेदनात म्हटले आहे की सोमवार पेठ फलटण येथील सर्वे नं.6 मध्ये भटक्या जाती जमाती मधील गरीब व कष्टकरी लोक सण 1965/66 पासून तेथे राहत आहेत सदर जागेचा कर,पानिपट्टी, घरपट्टी आणि इतर कर वेळोवेळी भरत आहेत सदर निवासी जागा खाली करून देण्यासाठी नगरपालिकामधील पदाधिकारी माजी नगरसेवक सोमा जाधव,नगरसेवक विक्रम जाधव व अंकुश गुराप्पा जाधव हे दबाव आनत आहेत या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना पदाधिकारी हे रात्री अपरात्री येऊन बंगल्यावर बोलावून तुम्ही तिथून निघून जा अन्यथा तुम्हाला मारून टाकू असा दम रहीवाशी नागरीकांना देत आहेत. तसेच मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांना ही मारून टाकण्याची धमकी दिली जाते आहे असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी, तहसीलदार, प्रांत यांना बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव काळूराम चौधरी, दादासाहेब गायकवाड, संदीप पवार, मंगेश मोरे, प्रेम मोरे, प्रवीण विटकर, मंगेश आवळे, दिनेश कांबळे व इतरांच्या सह्या आहेत.