देश
अॅमेझॉन ‘समर सेल’! मोबाइल, टीव्ही व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर ६०%पर्यंत डिस्काउंट
अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर लवकरच ‘समर सेल’ला सुरूवात होत आहे. ४ मेपासून अॅमेझॉनच्या सेलला सुरुवात आहे. पण अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी 24 तास आधी म्हणजे 3 मेपासून हा सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये मोबाइल, लॅपटॉप, टीव्हीसोबतच किचन अप्लायन्सेसवर भरघोस सवलत दिली जाणार आहे.
४ मेपासून ७ मे पर्यंत अॅमेझॉनचा हा सेल असणार आहे. या सेलमध्ये मोबाईल फोन्सवर ४० टक्के पर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. समर सेलसाठी अॅमेझॉननं स्टेट बँक ऑफ इंडियासोबत भागीदारी केली आहे. एसबीआयच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना १० टक्के सुट मिळणार आहे. तसंच या सेलमध्ये जवळपास पाच हजारांहून अधिक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर सवलत दिली जाणार आहे. टी.व्ही व अन्य काही इलेक्ट्रिक्स वस्तुंवर ६०%पर्यंत डिस्काउंट मिळेल.
सवलतीनंतर कोणत्या फोनची किंमत किती असेल हे अद्याप अॅमेझॉनकडून सांगण्यात आले नसले तरी कोणकोणत्या फोनवर सवलत मिळेल याची माहिती देण्यात आली आहे . अॅमेझॉन समर सेलमध्ये वनप्लस ६टी, शाओमी रेडमी ६ए, विवो नेक्स, आयफोन X, रियलमी यू१ आणि ऑनर प्ले हे स्मार्टफोन ग्राहकांना स्वस्तात मिळणार आहेत. त्याचबरोबर ओप्पो एफ ११, विवो व्ही १५प्रो, ओप्पो एफ ९प्रो, सॅमसंग गॅलक्सी एस१० आणि ओप्पो आर१७ या स्मार्टफोन्सवर एक्सचेंज डिस्काउंटसोबत एक्सचेंज बोनसदेखील मिळणार आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.