Menu

देश
आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देताना सचिन भावूक

nobanner

जगभरात आज मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून प्रत्येक सेलिब्रेटी आज सोशल मीडियावर, आपल्या आयुष्यात आईच्या योगदानाबद्दल व्यक्त होताना दिसतोय. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.

देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, याच कारणासाठी त्याने आईला बनवलं, असा संदेश देत सचिनने सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याआधीही सचिनने आपल्या आईसाठी खास वांग्याचं भरीत केलं होतं.