अपराध समाचार
आमदाराच्या गाडीची धडक, सख्खे भाऊ जागीच ठार; नागरिक संतप्त
- 298 Views
- May 20, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on आमदाराच्या गाडीची धडक, सख्खे भाऊ जागीच ठार; नागरिक संतप्त
- Edit
nobanner
धुळ्याच्या साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे यांच्या गाडीच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना साक्री-पिंपळनेर रस्त्यावर धाडणे फाट्याजवळ रविवारी (दि. १९) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
शांताराम दयाराम सोनवणे आणि सोनू दयाराम सोनवणे अशी मृत भावांची नावं आहेत. हे दोघे बाईकने साक्री येथून आपल्या गावी मलांजनला जात असताना अहिरे यांच्या कारची आणि बाइकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले.
दोन्ही मृतदेह रात्री शवविच्छेदनासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, आमदाराच्या गाडीच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Share this: