Menu

अपराध समाचार
कुलाब्यात परदेशी तरुणीवर बलात्कार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

nobanner

कुलाबा परिसरात एका परदेशी युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी युवा विनिमय कार्यक्रमांतर्गत(youth exchange programme) भारतात आली आहे. यादरम्यान तिची पद्माकर नांदेकर (वय ५१) या तरुणाशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत पद्माकरने तिच्यावर अत्याचार केले.

पीडित तरूणी ब्राझीलची नागरिक असून ती १९ वर्षांची आहे. मुंबईत आल्यानंतर तिची पद्माकर नांदेकर याच्याशी ओळख झाली. नांदेकर कुटुंबासोबत ती सहा महिने वास्तव्यास होती, पण यावर्षी मार्च महिन्यात ती दुसऱ्या कुटुंबासोबत वांद्रे येथे राहण्यास गेली. यानंतर १५ एप्रिल रोजी पद्माकरने तिला फोन करून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. यावेळी पद्माकरने तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले. यानंतर पद्मामकरने तिच्यावर अत्याचार केले. सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट तिच्या लक्षात आली. यानंतर ती वांद्र्यातील आपल्या घरी गेली. या कुटुंबातील व्यक्तींना तिचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी या तरूणीने घडलेला प्रकार त्यांना सांगितला.

यानंतर या कुटुंबाने संबंधित तरुणीला कफ परेड पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्राथमिक तपास केला. यावेळी तरुणीच्या आरोपात तथ्य आढळल्यानंतर पोलिसांनी पद्माकर विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी त्याला अटक केली. संबंधित महिला परदेशी असल्याने आणि हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांनी याबद्दलची अधिक माहिती उघड केलेली नाही.