देश
चिमुरड्या नंदिनीचा मृत्यू : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची गावकऱ्यांची मागणी
तीव्र पाणी टंचाईमुळे धुळे जिल्ह्यातील मोरदड तांडा येथील नंदिनी नथु पवार या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. विहिरीतून पाणी काढताना या चिमुरडीचा पाय घसरला आणि विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरदड तांडा या गावात प्रचंड रोष निर्माण झालाय. नंदिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी तसंच मागणी करुनही टँकरची संख्या न वाढवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईचा नंदिनी पहिला बळी ठरलीय. धुळे तालुक्यातील मोरदड तांडा इथं नंदिनी गावाजवळ असलेल्या एका खासगी विहिरीवर पाणी भरायला गेली होती. पाणी भरतानाच तिचा पाय घसरला आणि ती चाळीस फुटांहून अधिक खोल विहिरीत जाऊन पडली. नंदिनीचा विहिरीत पडल्याबरोबर जागीच मृत्यू झाला.
नंदिनी ही अत्यंत हुशार मुलगी होती. ती यंदा सातवी इयत्तेत जाणार होती. मात्र अशा या हुन्नरी विद्यार्थिनीचा पाणी टंचाईनं जीव घेतल्यानं गावात हळहळ व्यक्त होतेय. नंदिनीच्या कुटुंबीयांना आर्थिक मिळावी, अशी अपेक्षाही गावकऱ्यांनी व्यक्त केलीय.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.