Menu

अपराध समाचार
दुचाकीवर अश्लील चाळे, प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल

nobanner

दिल्लीतील राजौरी गार्डन येथे दुचाकीवर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडितील तरुण हा वेगाने दुचाकी चालवत असून त्याच्यासोबतची तरुणी दुचाकीच्या फ्युएल टँकवर बसून तरुणासोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. एका आयपीएस अधिकाऱ्यानेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रेमी युगुलावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दिल्लीतील आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी १८ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. राजौरी गार्डन येथील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एक प्रेमी युगुल दुचाकीवरुन जाताना दिसत आहे. तरुण वेगात दुचाकी चालवत असून तरुण दुचाकीच्या फ्युएल टँकवर बसून तरुणासोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. धालीवाल यांनी अशा प्रेमी युगुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोटार वाहन कायद्यात अशा प्रकरणांसाठी नवीन कलम आणि शिक्षेचा समावेश करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांच्या वाहतूक शाखेनेही या व्हिडिओची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. व्हिडिओ शुटिंग करणाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा किंवा या युगुलाविषयी माहिती असल्यास पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रेमी युगुलावर कारवाईची मागणी केली आहे. दुचाकीवर असे चाळे करण्याची गरज काय,या युगुलाबाबतची माहिती तातडीने पोलिसांना द्या, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.